Information of Trade mark in Marathi

 आपल्या साठी थोडी कायदेशीर व्यावसायिक माहिती घेऊन आलीये.

आज चा विषय ट्रेडमार्क म्हणजे “ व्यापार चिन्ह “

हे असं काही आहे ज्या शिवाय तुमचा व्यवसाय हा ब्रांड बनू शकत नाहीं.

ट्रेड मार्क म्हणजे काय?

आपल्या व्यवसायाची असलेली वेगळी ओळख किंवा नाव याला ट्रेड मार्क किंवा व्यवसाय चिन्ह अस मन्हतात.

भारता मध्ये किती प्रकारचे ट्रेड मार्क आहेत?

भारतामध्ये ११ प्रकारचे ट्रेड मार्क व्यापार चिन्हं आहेत.

१- शब्द मार्क (word mark ) म्हणजे नाव चिन्ह जस हा तुमच्या व्यवसाया साठी उपयोगी आहे ह्याच उत्तम उदाहरण म्हणजे - टाटा कंपनी

२- लोगो मार्क (Logo mark or device mark)

हा एक असे चिन्हं आहे जे एका अक्षरा व्दारे किंवा फोटो व्दारे दर्शविला जातो. याला कायदेशीर भाषेत डिवाईस मार्क असे म्हणतात. याच उदाहरणं म्हणजे BMW गाडी चे चिन्हं.

३- कलर मार्क ( Colour mark) काही रंग एका कंपनीच्या नावा सोबत वापरले जातात त्याला रंग चिन्हं किंवा कलर मार्क म्हणतात. उदाहरण – डॉमिनोज, के. एफ. सी. चे रंग जे त्यांच्या व्यवसायाची ओळख आहेत व कंपनी व्दारे नोंद झालेली आहेत ज्यांना कोणीही वापरू शकत नाही.

४- शेप मार्क ( shape mark) म्हणजे आकार चिन्हं हे चिन्ह देखील आपण नोंद करून स्वतःच्या व्यवसाया साठी वापरू शकता. याच उदाहरणं – कीट केट चॉकलेट, कोका कोला ची बाटली इत्यादी याला ड्रेस मार्क असेही म्हणतात.

५- सर्टिफिकेशन मार्क (Certification Mark)

भारता मध्ये सर्वात जास्त वापरले जाणारे व्यवसाय चिन्हं म्हणजे प्रमाण पत्र चिन्हं कारण ते सरकार व्दारे भेटतात. खाजगी कंपन्या त्याचे वितरण करत नाहीत. व सरकार मान्यता प्राप्त गोष्टी हे सर्वात जास्त अधिकृत असल्याची अनुभूती देतात. 


 याच उदाहरण म्हणजे ( ISO )आय. एस. ओ. प्रमाणित कंपन्या ( fssai) खाद्य पदार्थ विक्री साठी चे प्रमाण पत्र इत्यादी.



६

- कलेक्टिव मार्क (Collective Mark)

एका विशिष्ट समुदाय त्याला मिळालेली व्यापार चिन्हं म्हणजे कलेक्टिव्ह मार्क. उदाहरण – वकिल, सी. ए, यांचे चिन्हं.

७- सीरिज मार्क (Series mark) सदर चिन्हं हे एकाच कंपनीच्या वेग - वेगळ्या उत्पादन किंवा सेवा साठी वापरला जातो

 उदाहरण – जीओ सिनेमा, जिओ मार्ट.

८- पेटर्ण मार्क (Pattern mark)

नमुना चिन्ह हे चिन्हं अत्याधिक कठीण पद्धति ने नोंद होत व भारता मध्ये खूप कमी कंपन्या व लोकांनी मिळवले आहे. याच अर्थ असा की हे चिन्हं त्या व्यवसायाची उद्देश दर्शवतो.

 उदाहरण – ( Addidas )    अडिदास,  तीन क्लाइंबिंग लाईन्स जे अस दाखवतात की जे आमच्या व्यवसायात साथ देईल त्याची उन्नती चढत्या क्रमाने निश्चित आहे.

९- ध्वनी चिन्ह (Sound mark )

  साउंड मार्क म्हणजे अशी ध्वनी जे इतर कोणत्याही व्यापाऱ्या कडे उपलब्ध नाही .जसे नोकिया ची ट्यून whirlpool, इत्यादी.

१०- मोशन मार्क (Motion Mark ) गती चिन्ह.

मोशन मार्क हे gif कंपन्या व्दारे घेतले जाते ज्यामधे एक व्हिडिओ काही सेकंदाचा असतो व त्यामदे एक गती दर्शवली जाते. याचं उत्तम उदहरण म्हणजे प्रत nokia कंपनी चे जुने फोन जे सुरू करताच दोन हाथ मिळवताना दिसायचे “ to shake hands “ असे ते gif आपण पाहत होतो ते नोकिया कंपनी व्दारे नोंद केले गेले होते.

११- सर्व्हिस मार्क (Service mark ) सेवा चिन्ह

सर्व्हिस मार्क ची नोंद करावी लागत नाही. ते व्यापार ॲक्ट १९९९ चा वर्ग ३५ ते ४५ मधे नम्मुद आहे. जसे “+” म्हणजे डॉक्टर इत्यादी कडून मिळालेली सेवा.  


Comments

Popular posts from this blog

CAVEAT

Fundamental duties

Information of Trade secret in Marathi